Ad will apear here
Next
पुणे केंद्रातून ‘आकार’ प्रथम
मुंबई : ५७व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून आगम संस्थेच्या ‘आकार’ नाटकाला प्रथम, तर पुण्याच्याच नाट्यमंडळ संस्थेच्या ‘कुलकर्णी आणि कंपनी’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

पुणे येथील रंगशीला संस्थेच्या ‘पन्नासपैकी सत्तेचाळीस फक्त’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले. स्पर्धेतील उर्वरित निकाल असे : दिग्दर्शन- प्रियांका चांदेरे (प्रथम, नाटक- आकार), संतोष माकुडे (द्वितीय, पन्नासपैकी सत्तेचाळीस फक्त). प्रकाशयोजना- वैभव नवसकर (प्रथम, आकार), सुबोध राजगुरू (द्वितीय, मुंबई मान्सून). नेपथ्य- अश्विनी करंदीकर (पथम, आकार), अजिंक्य गोखले (द्वितीय, कुलकर्णी अँड कंपनी). रंगभूषा- वृषाली वडनेरकर (प्रथम, शामपट), नरेंद्र वीर (द्वितीय, येरा गबाळ्याचे काम नोहे).

जयदीप मुजुमदार (मुंबई मान्सून) व जान्हवी देशपांडे (आया सावन झूम के) यांना उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक जाहीर झाले. उन्नती कांबळे (येरा गबाळ्याचे काम नोहे), रश्मी देव (शामपट), मुक्ता लेले (मुंबई मान्सून), श्रेया गोफणे (आती रहेंगी बहारे), अभिजित केळकर (आकार), आशिष कुलकर्णी (शामपट), संकेत जोशी (कुलकर्णी अँड कंपनी), चिन्मय संत (पन्नासपैकी सत्तेचाळीस फक्त) यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

येथील भरत नाट्य संशोधन मंदिरात ६ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत उत्साहात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. विष्णू पुरीकर, राजेंद्र जोशी, मालती भोंडे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZZPBJ
Similar Posts
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
‘लढवय्ये ते लढले... हल्लेखोरांसमोर नच नमले’ पुणे : ‘२६/११ ची वीरगाथा, ऐकोनी आदरे झुकेल माथा.... लढवय्ये ते लढले, हल्लेखोरांसमोर नच नमले...’ अशा शब्दांत मुंबई शहरावर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा थरार कीर्तनातून ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. विश्वासबुवा कुलकर्णी यांनी कीर्तनातून ‘२६/११ची वीरगाथा’ उलगडली
सारस्वत बँकेतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत पुणे : सहकार क्षेत्रातील अग्रणी सारस्वत बँकेतर्फे कोल्हापूर-सांगलीसह राज्याच्या इतर भागातील पुरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयाचा मदतनिधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’स देण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक कोटी रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला
द्राक्ष मळ्याच्या पर्यटनाची अनोखी संधी मुंबई : द्राक्षांची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पादन कसे घेतात, द्राक्षांचे वेगवेगळे प्रकार कोणते, द्राक्षांपासून वाईनची निर्मिती कशी होते अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच द्राक्षांची प्रत्यक्ष शेतात जाऊन चव चाखण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language